किडनी निकामी झाल्याने नाही तर ‘हे’ आहे सतिश शहा यांच्या मृत्यूचे खरे कारण

ज्येष्ठ अभिनेते सतिश शाह यांच्या निधनाने संपूर्ण बॉलीवूड हळहळले. त्यांचे निधन किडणी फेल्युअरमुळे झाल्याचे बोलले जात होते. पण त्यांच्या निधनाचे खरे कारण समोर आले आहे. त्यांचा सहकलाकार अभिनेता राजेश कुमारने त्यांच्या निधनाचे कारण सांगितले आहे.

‘साराभाई व्हर्सेस साराभाई’ मालिकेतील त्यांचा ऑनस्क्रिन मुलगा राजेश कुमारने बॉलीवूड हंगामाला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी शहा यांच्या मृत्यूचे कारण सांगितले आहे. ते म्हणाले, मागचे काही तास भावनिक होते. त्याचे शब्दात वर्णन करता येणार नाही. व्यक्तही होणं कठिण झालं आहे. सतिशजींचे निधन किडणीच्या आजाराने नव्हे तर हृदयविकाराच्या झटक्याने झाले आहे, असे राजेशकुमार म्हणाले.

सतिश शहा यांना किडणीचा आजार होता. ते घरी होते, जेवण वगैरे सर्व करत होते. त्यांचे किडणीच्या आजारांवरील उपचार झाले होते. दुर्देवाने त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांचा मृत्यू झाला असे त्याने स्पष्ट केले.