Satyacha Morcha Live Update – शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मोर्चासाठी रवाना

मतचोरी आणि मतदार याद्यांमधील घोळाबद्दल निवडणूक आयोगाचा निषेध नोंदवून लोकशाहीचा आणि खऱ्या मतदारांचा आवाज बुलंद करण्यासाठी आज सर्वपक्षीय महामोर्चा मुंबईत निघणार आहे. असत्याविरोधात सत्याचा आवाजच यावेळी घुमणार असून या धडक मोर्चाला लाखोंची गर्दी उसळणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह काँग्रेस तसेच डाव्या पक्षांचे वरिष्ठ नेते या मोर्चाचे नेतृत्व करणार आहेत.

    • घाटकोपर पश्चिम येथून आलेल्या राजेश सावंत या मनसेच्या सैनिकाने हातात फलक घेऊन ‘चले जाव भाजप’ असे नारे दिले. तुमच्यात हिंमत असेल तर ECM ऐवजी बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या, असे आवाहन त्यांनी केले.

    • शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार अनिल देसाई, मनसे नेते बाळा नांदगावकर, अविनाश अभ्यंकर यांनी सभास्थळाचा आढावा घेतला

      • शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मोर्चासाठी रवाना
      • अहिल्यानगर येथून मोर्चासाठी आलेला मुस्लिम तरुण अजिज मोमिन याच्या बॅनरने वेधले लक्ष

      • छत्रपती शिवाजी महाराज स्थानकात निवडणूक आयोग, भाजपा विरोधात सत्याचा मोर्चेकरांची जोरदार घोषणाबाजी

      • शिवसेनेचे माजी खासदार राजन विचारे आणि मनसे नेते, ठाणे-पालघरचे विभागप्रमुख अविनाश जाधव मोर्चासाठी रवाना
      • चर्चगेट रेल्वे स्थानकावर मोठ्या प्रमाणात पोलिसांचा फौजफाटा तैनात

      • महापालिका मार्ग महाविकास आघाडी व मनसेच्या झेंड्यांनी फुलला

      • राज ठाकरे यांचा दादर ते चर्चगेट लोकलने प्रवास

      • मनसे अध्यक्ष राज ठाकरे मोर्चासाठी रवाना

      • रस्त्याच्या दुतर्फा शिवसेना, मनसे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार, काँग्रेस आणि डाव्या पक्षांचे झेंडे फडकले
      • चर्चगेट परिसरात मोर्चाची जय्यत तयारी

      • थोड्याच वेळात निवडणूक आयोगावर धडकणार मोर्चा

मोर्चाला येणाऱ्यांसाठी सूचना

    • पूर्व उपनगरातून वाहनाने वा मध्य रेल्वेने येणाऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे स्थानकातून उतरल्यानंतर रस्ता पार करून आराम हॉटेल (कॅपिटल सिनेमा) शेजारील रस्त्याने आझाद मैदान आणि मुंबई (बॉम्बे) जिमखाना दरम्यानच्या पायवाटेने फॅशन स्ट्रीटवर पोहोचावे.
    • नवी मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली येथून येणाऱ्यांनी वरीलप्रमाणे अथवा जर फ्री वेने आलात तर पी. डिमेलो रोड ने जीपीओजवळ उतरून चालत वरील मार्गाने फॅशन स्ट्रीटवर पोहोचावे.
    • पश्चिम उपनगरातून येणाऱ्यांनी चर्चगेट स्टेशनवर उतरावे, आयकर भवनच्या (सरस्वती रोड, महात्मा गांधी रोड) गल्लीतून मुंबई (बॉम्बे) रुग्णालयाच्या रस्त्याने चालत फॅशन स्ट्रीटवर पोहोचावे. अथवा पुढे चर्चगेट स्थानकासमोरील पश्चिम रेल्वेच्या मुख्यालयासमोरील सिग्नलकडून डाव्या बाजूला वळून हुतात्मा चौकाकडे जाणाऱ्या रस्त्याने फॅशन स्ट्रीटवर पोहोचावे.
    • पश्चिम उपनगरातून मेट्रोने येणाऱ्यांनी हुतात्मा चौक स्थानकावर उतरावे. तेथून फॅशन स्ट्रीटवर यावे.