आरेतील झाडे वाचवा लतादीदींचे आवाहन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आरे वसाहतीतील वृक्षतोडीविरोधात गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी आवाज उठवला आहे. मेट्रो कार शेडसाठी 2700 हून अधिक झाडांची कत्तल करणे, आरेच्या जीवसृष्टी आणि सौंदर्याला हानी पोहोचवणे अत्यंत दुःखद गोष्ट आहे. मी या निर्णयाचा तीव्र विरोध करते. सरकारने आपल्या निर्णयावर पुनर्विचार करावा अशी मागणी लतादीदींनी ट्विटरच्या माध्यमातून केली आहे.

कुलाबा–वांद्रे–सीप्झ या मार्गावरील मुंबई मेट्रो-3 प्रकल्पांतर्गत कारडेपो उभारणीसाठी आरे कॉलनीतील वृक्षांवर कुऱहाड चालवण्याच्या प्रस्तावाला वृक्ष प्राधिकरण समितीने मंजुरी दिली आहे. त्यावेळी शिवसेनेने विकासाच्या नावावर होणाऱ्या झाडांच्या कत्तलीला जोरदार विरोध केला. भाजप, राष्ट्रवादीसह न्यायालयाच्या आदेशाने नेमणूक झालेल्या वनस्पतीतज्ञांनीही झाडे तोडण्याच्या बाजूने मतदान केले होते. काँग्रेसच्या नगरसेवकांनी ऐनवेळी सभात्याग केल्याने प्रस्ताव 8 विरुद्ध 6 मतांनी मंजुरी मिळाली होती.

आरे वसाहतीतील निसर्गसंपदा वाचवण्यासाठी आता अनेक दिग्गज व्यक्ती पुढे येत आहेत. त्यामुळे वृक्षतोडीविरोधात आता सरकारवर दबाव वाढत आहे.