नगरसेवक मतीन अटकेत, बंदुकीचा धाक दाखवून महिलेवर बलात्काराचा आरोप

65
syed-matin-mim

सामना ऑनलाईन । चाकण

संभाजीनगर येथील नगरसेवक सय्यद मतीन याला चाकण मधून अटक करण्यात आली आहे. बंदुकीचा धाक दाखवत महिलेवर बलात्कार केल्याच्या आरोपा खाली मतीन याला अटक करण्यात आली आहे.

सय्यद मतीन सोबत आणखी दोघांवर आरोप करण्यात आले आहेत. 26 नोव्हेंबर 2018 ते 24 फेब्रुवारी 2019 या कालावधीत घडल्याचे यामध्ये नमूद करण्यात आले आहे. ओळखीचा गैरफायदा घेत मतीन याने महिलेला तिची आई आजारी असल्याचे सांगून आपल्या गाडीत बसवले आणि तिला खंडाळा येथील एक रेसॉर्टवर नेले. तिथे तिला बंदुकीचा धाक दाखवून विनयभंग केला आणि गुंगीचे औषध पाजून तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप मतीन वर आहे. तसेच त्याचा भाऊ आणि मेव्हणा यांच्यावर देखील गुन्हा दाखल झाला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या