दिलासा! एसबीआयकडून व्याजदरात कपात

स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय) ने आपल्या ग्राहकांना मोठा दिलासा दिला आहे. बँकेने व्याजदरात 0.25 बेसिस पॉइंट्सची कपात केली आहे. हा बदल सोमवारपासून लागू करण्यात आला आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने रेपो रेटमध्ये 0.25 ची कपात केल्यानंतर एसबीआयने हा निर्णय घेतला आहे. एसबीआयच्या या निर्णयानंतर नव्या वर्षात ईएमआय कमी होईल. तसेच नवीन कर्ज घेणेही स्वस्त होईल. एसबीआयने मार्जिनल कॉस्ट ऑफ फंड्स-बेस्ड लेंडिंग रेट (एमसीएलआर) च्या सर्व काळासाठी 0.25 बेसिस पॉइंटची कपात केली आहे. यांचा हजारो लोकांना फायदा होईल.