
स्टेट बँक आँफ इंडियाने (एसबीआय) गृहकर्जावरील व्याजदरात वाढ केली आहे. बँकेने गृहकर्जावरील व्याजदर 6.70 टक्क्यावंरून 6.95 टक्क्यांपर्यंत वाढवला आहे. तसेच गृहकर्जावर प्रोसेसिंग फीदेखील द्यावी लागणार आहे.
75 लाखांपर्यंतच्या गृहकर्जावरील व्याजदर 6.70 वरून 6.95 टक्क्यांपर्यंत तर 75 लाखांवरील गृहकर्जावरील व्याजदर 6.75 वरून 7 टक्क्यांपर्यंत वाढवण्यात आला आहे. तसेच यापुढे ग्राहकांना 0.40 टक्के प्रोसेसिंग फी देखील द्यावी लागणार आहे. प्रोसेसिंग फी 10 ते 30 हजार रूपयांपर्यंत असू शकते.




























































