पोलिसांचा दणका, स्कूल बस चालकाला गुडघ्यावर चालवले; गरिब टेम्पो चालकाला मारहाण करीत केली होती तोडफोड

गरिब टेम्पो चालकाला मारहाण करीत त्याच्या वाहनाची काच फोडून नुकसान करणाऱया मस्तवाल स्कूल बस चालकाला हडपसर पोलिसांची काही तासात अटक केली. त्याची धिंड काढून गुडघ्यावर चालवित माझी चूक झाली, पुन्हा अशी गफलत करणार नाही, मला माफ करा असे वदवून घेत पुण्यात कायद्याचेच राज्य असल्याचे दाखवून दिले आहे. दरम्यान, याप्रकरणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून, नेटीझन्सनी पोलिसांच्या कारवाईचे कौतुक केले आहे. रमेश पाटील (32  रा. पिंपरी चिंचकड) असे अटक केलेल्या बसचालकाचे नाव आहे.

मगरपट्टा ब्रिजजकळ स्कुलबस चालकाने (एम.एच.14 एम.एम. 9837) वाहन बेदकारपणे चालकले. त्यानंतर त्याने टेम्पो  चालकाला अडवून  शिकीगाळ करीत हाताने मारहाण केली. तसेच बसमधील लोखंडी टामीने टेम्पोची काच तोडुन नुकसान केले होते.  ही घटना 9 ऑक्टोबरला दुपारी तीनच्या सुमारास घडली होती. याप्रकरणाचा एका नागरिकाने व्हिडिओ रेकॉर्ड करून व्हायरल केला. स्कुलबस चालकाने सार्कजनिक रस्त्याकर दहशत निर्माण केल्याचे व्हिडिओतून दिसून आले होते. त्यानुसार टेम्पो चालकाने तातडीने हडपसर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली होती. दरम्यान, नागरिकांची सुरक्षितता आमच्यासाठी सर्वोच्च असल्याचे प्रतिपादन पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी नुकतेच केले होते. त्याचअनुषंगाने हडपसर पोलिसांनीही मस्तवाल स्कुलबस चालकाची दहशत मोडीत काढली.

व्हिडिओही व्हायरल

हडपसरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मोगले यांनी तपास पथकाला आरोपीला ताब्यात घेण्याचे आदेश दिले. वाहन क्रमांकाच्या आधारे पोलिसांनी  आरोपीचा पत्ता शोधून काढला. काही तासात आरोपी स्कुलबस चालक रमेश पाटील याला ताब्यात घेतले. त्यानंतर त्याला घटनेच्या ठिकाणी नेउन थेट गुडघ्यावर बसवून चालायला भाग पाडले. माझी चूक झाली, पुन्हा अशी चूक घडणार नाही, मला माफ करा अशी याचना आरोपीने केली. त्याचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.