मुले ‘वेटलिफ्टर’ नाहीत; दप्तराचे ओझे नको

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, चेन्नई

मुलांना बालपणाचा आनंद लुटू द्यायला पाहिजे. मुलांवर शिक्षणाचे ओझे लादू नका. त्यांच्यावर कोणताही ताण देऊ नका. इयत्ता दुसरीपर्यंत मुलांना होमवर्क (गृहपाठ) देऊ नये, असे महत्त्वपूर्ण आदेश मद्रास उच्च न्यायालयाने दिले आहेत. दरम्यान, दप्तराचे ओझे कमी करा. मुले ‘वेट लिफ्टर’ नाहीत, असेही न्यायालयाने सुनावले आहे.

होमवर्क आणि दप्तराचे ओझे यासंदर्भातील एका याचिकेवर न्यायमूर्ती एन. किरुबाकरन यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. यावेळी सीबीएसई शाळांमध्ये एनसीआरटी अभ्यासक्रम सुरू करण्याचे आदेश न्यायालयाने दिले. केंद्र सरकार आणि ‘एनसीआरटी’ला चार आठवडय़ात म्हणणे मांडण्यास सांगितले आहे.

हायकोर्टाने काय म्हटले

  • बालपणाचा आनंद पूर्णपणे मुलांना लुटू द्या. तो त्यांचा अधिकार आहे. त्यामुळे मुलांवर कोणताही ताण देऊ नये.
  • मुलांना शिक्षणासाठी अनुकूल वातावरण तयार करावे. पहिली आणि दुसरी इयत्तेतील मुलांना होमवर्क देऊ नये.
  • होमवर्क दिल्याने मुलांच्या झोपेवर परिणाम होतो. पूर्ण झोप झाली नाही तर मुलांचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य बिघडते.
  • पूर्ण झोप घेण्याचा मुलांना अधिकार आहे. घटनेतील २१व्या कलमांमध्ये हा अधिकार दिला आहे.
  • मुलांच्या पाठीवर दप्तराचे ओझे नको. मुले ‘वेटलिफ्टर’ नाहीत. त्यांची दप्तरे म्हणजे मालवाहतूक करणारे कंटेनर नाहीत. मुले पाच वर्षांची होईपर्यंत हातात पेन्सिलही देऊ नका.