
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म असलेल्या रेडिटवर दररोज शेकडो नोकरदार त्यांच्या कामाच्या ठिकाणी घडलेले चांगले-वाईट अनुभव शेअर करत असतात. अशाच प्रकारे एका कंपनीतील एका कामगाराने त्याला सुट्टीबाबत आलेला वाईट अनुभव शेअर केला आहे. एका खासगी कंपनीत काम करत असेल्या कर्मचाऱ्याला त्याचे डोके दुखत असल्याने सुट्टी हवी होती. मात्र, ‘फक्त डोकं दुखतंय म्हणून सुट्टी मिळत नाही’ अशा प्रकारची प्रतिक्रिया बॉसने देत सुट्टी नाकारल्याचे या कर्मचाऱ्याने म्हटले आहे. औषध घ्या हीरो … तुम्ही आता शाळेत नाही. कंपनीत आहात, असा टोला बॉसने त्याला हाणला आहे. या दोघांमधील संभाषणाच्या व्हॉट्सअॅप चॅटचा स्क्रीनशॉट आता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.