
साताऱ्यातील कोरेगाव तालुक्यातील चिमणगाव येथून वर्षा पर्यटनासाठी कास पठाराकडे गेलेल्या पर्यटकांची स्कॉर्पिओ यवतेश्वर ते कासदरम्यान पाचशे फूट खोल दरीत कोसळून झालेल्या अपघातात सातजण जखमी झाल्याची घटना सायंकाळी घडली. जखमींपैकी तिघांची प्रकृती गंभीर असल्याचे पोलिसांनी सांगितले.
कोरेगावातील अतिउत्साही पर्यटक आज कास, बामणोली परिसराकडे गेले होते. एका स्कॉर्पिओतील पर्यटक यवतेश्वर ते कास दरम्यानच्या गणेश खिंडीजवळील मस्ती करत होते, असे समजते. यातूनच त्यांची स्कॉर्पिओ पठारावरून पाचशे फूट खोल दरीत कोसळली. अपघाताचे वृत्त समजताच, पोलीस यंत्रणा घटनास्थळी धावली. रात्री उशिरापर्यंत बचावकार्य सुरू होते.