चेहऱ्याला तजेला आणण्यासाठी ‘या’ फळांचा उपयोग करा, वाचा

गणपतीनंतर विविध सणा समारंभांना सुरुवात होते. सण समारंभ येणार म्हटल्यावर, महिलांची पार्लरमध्ये जाण्याची लगबग सरु होते. पार्लरमध्ये जाऊन आपण त्वचेची काळजी घेण्यसाठी नानाविध उपाय करतो. यामुळे खिशाला तर भूर्दंड पडतोच. शिवाय अनेकांना पार्लरमधील ट्रिटमेंटही सहन होत नाहीत. यापेक्षा आपण काही घरगुती उपायांनी आपल्या चेहऱ्याचे सौंदर्य वाढवू शकतो. फळांचे मास्क हे आपल्या चेहऱ्यासाठी खूप महत्त्वाचे मानले जातात.

उत्तम आरोग्यासाठी काय आहेत ध्यानाचे फायदे?

टरबूजचा मास्क बनविण्यासाठी सर्वात पहिले आपल्याला त्यातील बिया काढाव्या लागतील आणि टरबूज स्मॅश करावं लागेल. त्यानंतर स्मॅश केलेल्या टरबुजमध्ये लिंबाचा रस टाका. आता कापसाच्या मदतीनं आपल्या चेहऱ्यावर आणि हाता-पायांवर हा मास्क लावून घ्या. जेव्हा हा मास्क वाळेल, त्यानंतर त्यावर दुसरा आणि मग तसाच तिसरा कोट लावावा. अखेर कॉटन फळाच्या ज्यूसमध्ये बुडवून आपल्या डोळ्यांवर ठेवावा आणि आराम करावा. मास्क पूर्णपणे वाळल्यानंतर साध्या पाण्यानं चेहरा धुवून टाकावा.

गायीचे की म्हशीचे दूध? पचन आणि मूत्रपिंडासाठी कोणते दूध चांगले, जाणून घ्या

संत्र्याचा मास्क तयार करण्यासाठी आपण संत्र्याचा ज्यूस कुठल्याही फेस पॅकमध्ये मिक्स करावा आणि चेहऱ्यावर लावावा. जेव्हा मास्क वाळेल तेव्हा साध्या पाण्यानं चेहरा धुवून टाकावा. आपल्याला हवं असल्यास संत्र्यानं चेहऱ्यावर मसाज करू शकता. असं केल्यानं आपल्याला जास्त फायदा मिळेल. पण एक गोष्ट लक्षात ठेवावी संत्र्याच्या गरानं चेहऱ्यावर मसाज करण्यापूर्वी ते फ्रीजमध्ये ठेवून थंड केल्यास उत्तम.

हळदीमध्ये एक चिमूटभर ‘हा’ मसाला मिसळा, आरोग्याला मिळतील भरपूर फायदे

काकडीच्या मास्कचा प्रत्येकानंच आवर्जून वापर करावा. काकडीचा रस काढून तो अनेक वेळा आपल्या चेहऱ्यावर लावावा. आपल्याला हवं असल्यास त्यात लिंबाचा रसही मिसळू शकतो. कारण त्याचा नैसर्गिक ब्लिचिंग एजंट म्हणून उपयोग होतो. या मास्कमुळं उन्हामुळे गेलेली चेहऱ्यावरील चमक परत येते.