7 सप्टेंबरला दिसणार वर्षातील दुसरे चंद्रग्रहण

मार्चमध्ये ब्लड मून दिसल्यानंतर या वर्षातील दुसरे चंद्रग्रहण हे 7 सप्टेंबरला दिसणार आहे. हिंदुस्थानी वेळेनुसार, हे चंद्रग्रहण रात्री 8 वाजून 58 मिनिटांनी सुरू होणार असून 8 सप्टेंबरला 1 वाजून 25 मिनिटांपर्यंत चालणार आहे. हे चंद्रग्रहण रात्री 11 ते 12.22 वाजेपर्यंत स्पष्टपणे दिसेल. हिंदुस्थानातील लखनऊ, दिल्ली, कोलकाता, चेन्नई, बंगळुरू, मुंबई, पुणे, गोवासह अनेक शहरांत हे चंद्रग्रहण दिसणार आहे. चंद्रग्रहणाच्या 9 तास आधी सूतक काळ सुरू होईल.