यंदाचा सीड पुरस्कार – ‘इंडियन एंटरप्राईज रिसायकलिंग मेनस्ट्रुअल पॅड्स’

seed-award

मेनस्ट्रुअल पॅड्समधून पुनर्चक्रणीय साहित्याची निर्मिती करणाऱ्या देशी स्टार्टअपला आज सीड लो कार्बन अॅवॉर्ड्स (सीड अवॉर्डस्) विजेते म्हणून सन्मानित करण्यात आले आहे. हे पुरस्कार युनायटेड नेशन्स एन्व्हायरोन्मेंट प्रोग्राम (यूएनईपी), युनायडेट नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्राम (यूएनडीपी) आणि इंटरनॅशनल फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचर (आययूसीएन) यांनी केलेल्या जागतिक सहयोगाचा भाग आहेत.

2018 मध्ये उद्योजक अजिंक्य धरिया यांनी स्थापना केलेले पॅडकेअरचे एनएबीएल-प्रमाणित प्रोसेसिंग युनिट पूर्णत: धूरविरहित असून आवाजरहित कार्यसंचालनाची खात्री देते. हे युनिट प्रतिदिन सेल्युलोज व प्लास्टिकमधील जवळपास 3000 पॅड्सवर प्रक्रिया करते, ज्यांचे पुनर्चक्रण करता येऊ शकते. प्रत्येक 1000 महिलांसाठी पॅडकेअर दर महिन्याला लँडफिल्समधून 8000 हून अधिक पॅड्स, घेऊन त्यांना पुनर्वापर होणाऱ्या उत्पादनांमध्ये रुपांतरित करते, ज्यामुळे दरमहिन्याला जवळपास 40 टन कार्बन डायऑक्साइडची बचत होऊ शकते. पुणे-स्थित पॅडकेअर शिबिरे व #ponderwithpadcare मोहिमेच्या माध्यमातून मासिक पाळीदरम्यान आरोग्याची घ्यावयाच्या काळजीबाबत देखील जागरुकता निर्माण करते. #ponderwithpadcare मोहिमेचा मासिक पाळीदरम्यान महिलांचे काम व शाळेमधील अनुपस्थितीचे प्रमाण कमी करण्याचा मनसुबा आहे. सीडच्या पाठबळासह पॅडकेअर युनिटची साहित्य हाताळण्याची क्षमता सुधारेल आणि प्रक्रियेसाठी येणार खर्च कमी करेल.

आपली प्रतिक्रिया द्या