चँडलर बिंगची शोकांतिका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> सीमा खंडागळे

‘फ्रेंड्स’ या जगप्रसिद्ध विनोदी टीव्ही सीरियलमध्ये चँडलर बिंगची भूमिका करण्यासाठी प्रसिद्ध असलेला अभिनेता मॅथ्यू पेरी हा आपल्या लॉस एंजेलिसमधील घरात टबमध्ये मागील शनिवारी मृतावस्थेत आढळला. तो 54 वर्षांचा होता. मॅथ्यू पेरीच्या जगभरातील करोडो चाहत्यांसाठी दुःखद घटना आहे. ‘फ्रेंड्स’ या विनोदी टीव्ही शोने जगात लोकप्रियतेचा उच्चांक गाठला होता. हा टीव्ही शो न्यूयॉर्क शहरात राहणाऱया रेचेल, चँडलर, मोनिका, फिबी, जोई या सहा मित्रांच्या दैनंदिन घटनांवर आधारित होता. या शोमध्ये प्रेम, नातेसंबंध, करीअरमधील चढउतार व मैत्री यांसह विविध विषय हे विनोदाच्या सहाय्याने हाताळले गेले होते. त्यामुळेच ‘फ्रेंड्स’ची भुरळ युवकांना पडली होती. मॅथ्यू पेरीने टीव्ही सीरियलमध्ये साकारलेले चँडलर बिंगचे पात्र जगामध्ये खूपच लोकप्रिय झाले होते.

पेरीचा जन्म हा 1969 मध्ये पॅनडामध्ये झाला होता. त्याचे वडील जॉन बेनेट पेरी हे गायक व अभिनेते होते, तर आई सुझान पेरी ही पॅनडाचे माजी पंतप्रधान पियरे टडो (जे सध्याच्या पॅनडाचे पंतप्रधान जस्टिन टडोचे वडील आहेत) यांची जनसंपर्क अधिकारी होती, पण मॅथ्यू पेरी हा एक वर्षाचा होण्याच्या आतच या दोघांचा घटस्पह्ट झाला. ज्याचा मॅथ्यू पेरीच्या जीवनावर खोलवर परिणाम झाला. त्यामुळेच तो किशोरवयात दारूकडे वळला. याचा परिणाम असा झाला की, घरी तसेच शाळेत लोकांशी त्याचे खटके उडू लागले. याच काळात त्याने सध्याच्या कॅनडाच्या पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांच्याशी शाळेत मारामारी केल्याचे पेरीने आपल्या आत्मचरित्रात कबूल केले आहे. पुढे वयाच्या 14 वर्षी व्यावसायिक टेनिस खेळाडू बनण्याच्या उद्देशाने पेरीने आपल्या मुक्काम लॉस एंजेलिसला हलवला, पण येथे व्यावसायिक टेनिस खेळाडूसाठी लागणारे गुण आपल्याकडे नाहीत हे उमजल्यावर त्याने अभिनयाकडे आपला मोर्चा वळवला. या काळातही त्याचे दारूचे व्यसन सुरूच होते. पुढे मॅथ्यू पेरीला ‘सेपंड चँन्स’, ‘चार्ल्स इन चार्ल्य’, ‘सिड्नी’, ‘बेव्हरली हिल्स’, अशा टीव्ही शोमध्ये छोटय़ा-मोठय़ा भूमिका मिळाल्या, पण त्याच्या कारकीर्दीतील सर्वात महत्त्वाची भूमिका 1994 ‘फ्रेंड्स’ शोमधील चँडलर बिंगची भूमिका ठरली. पेरीने आपल्या आत्मचरित्रात सांगितले की, दुसऱया एका टीव्ही सीरियलमधील भूमिकेसाठी होकार दिल्यामुळे तो चँडलर बिंग या भूमिकेला मुकणार होता, पण काही कारणास्तव पेरीने होकार दिलेली टीव्ही सीरियलची निर्मिती झालीच नाही व चँडलरची भूमिका मॅथ्यू पेरीला मिळाली.

पेरीने या आत्मचरित्रात असेही नमूद केले होते की, चँडलर बिंग या व्यक्तिरेखेचे माझ्या वैयक्तिक जीवनाशी खूप साम्य होते. चँडलर हादेखील माझ्यासारख्या एका दुभंग कुटुंबातून आलेला असतो. तसेच आपल्या भावनिक वेदनांचा सामना करण्यासाठी व त्या लपवण्यासाठी तो माझ्यासारखाच विनोदाचा वापर करतो. यामुळेच मी ही भूमिका समरस होऊन वठवू शकलो. हेच कारण आहे, ही भूमिका एवढी प्रसिद्ध झाली. या भूमिकेमुळे पेरीला प्रसिद्धी, पैसा, हॉलीवूड चित्रपटांमध्ये भूमिका मिळाल्या. हॉलीवूडच्या अनेक अभिनेत्रींनाही त्याची भुरळ पडली होती. यामध्ये ज्युलिया रॉबर्टस्चाही समावेश होता.

अर्थात ‘फ्रेंड्स’चे शूटिंग चालू असतानाही मॅथ्यू पेरीचे दारूचे व्यसन वाढलेलेच होते. या व्यसनचा परिणाम हा त्यांच्या कामावर झाला नव्हता, पण हे सगळे बदलले 1996 मध्ये जेव्हा त्याची पहिली प्रमुख भूमिका असणाऱ्या ‘फुल रश इन्स’ या चित्रपटाचे चित्रीकरण सुरू होते. या चित्रीकरणादरम्यान पेरीच्या मानेला दुखापत झाली, ज्यामुळे त्याला वेदनाशामक औषधे लिहून देण्यात आली. या दुखापतीमुळेच त्याला प्रिस्क्रिप्शन ड्रग्सचे व्यसन लागले व त्याच्या कारकीर्दीची वाताहत झाली.

त्याचे हे व्यसन एवढे वाढले की, त्याला अनेक वेळा व्यसनमुक्ती केंद्रात भरती करण्यात आले. याचा परिणाम ‘फ्रेंड्स’च्या चित्रीकरणावर झाला, पण या कठीण काळात ‘फ्रेंड्स’च्या सहकलाकारांनी त्याला सांभाळून घेतले. याच काळात पेरीच्या हातून अनेक हॉलीवूड चित्रपटाच्या संधी निघून गेल्या. 2004 मध्ये सलग दहा वर्षे अव्वल क्रमांकावर राहिल्यानंतर ‘फ्रेंड्स’ या शोने प्रेक्षकांचा निरोप घेतला. या नंतरचा काळ हा तर पेरीसाठी अधिक कठीण काळ होता. कारण त्याची व्यसनाधीनता अजून वाढली होती व यामुळे त्याच्या व्यसनमुक्ती केंद्राच्या वाऱ्याही वाढल्या होत्या. तसेच ‘फ्रेंड्स’नंतर कोणतीही मोठी भूमिका पेरीला मिळाली नाही. 2020 च्या सुरुवातीला पेरी हा व्यसनाधीनतेमुळे मरणाच्या दारातून परत आला. त्यानंतरच्या काळात पेरीने अल्कोहोलिक्स अॅनॉनिमसबरोबर व्यसनाधीनतेबद्दल जागृतीचे कार्य करण्यास सुरुवातही केली होती, पण मॅथ्यू पेरीने अचानक जगातूनच एक्झिट घेतली. त्याचे हे जाणे चटका लावून जाणारेच आहे.

(लेखिका या महाराष्ट्रात जनसंपर्क व सोशल मीडिया क्षेत्रात कार्यरत आहेत.)

[email protected]