बचत गटांनी बनवलेले पेपर बॅग, पापड, मास्क ऍमेझॉनवर; उपक्रमाचा हसन मुश्रीफ यांनी केला शुभारंभ

280

बचत गटांनी बनवलेले पेपर बॅग, पापड, मास्क, टेराकोटा ज्वेलरी आदी उत्पादने ही अॅमेझॉन आणि जीईएम या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर उपलब्ध करण्यात आली आहेत. यामुळे बचतगटांना व्यवसाय आणि ग्राहकांना त्यांच्या वस्तू सुलभरीत्या घरपोच मिळणार आहेत, अशी माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. मुश्रीफ यांनी मंत्रालयात या उपक्रमाचा शुभारंभ केला.

स्वयंसहाय्यता समूहांच्या उत्पादनांना बाजारपेठ मिळवून देण्यासाठी उमेद अभियानामार्फत विविध स्तरावर ‘सरस’ प्रदर्शनांचे आयोजन करण्यात येते; परंतु स्वयंसहाय्यता समुहांनी तयार केलेल्या उत्पादनांना वर्षभर मागणी राहते. त्यामुळे प्रदर्शन संपल्यानंतरही ग्राहकांना बचतगटांच्या वस्तू वर्षभर मिळाव्यात यासाठी अॅमेझॉन व जीईएमसारखी ऑनलाईन बाजारपेठ उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या