सेलू – रायपूर शिवारात आढळला वाघ, शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण

881

रायपूर येथे सोमवारी सायंकाळी सातच्या सुमारास मोठा वाघ आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली असून शेतकरी भीतीच्या छायेत आहेत. संभाजीनगर येथे बिबट्या आढळल्याची बातमी ताजी असतानाच सेलू तालुक्यात वाघ आढळल्याने सर्वत्र भीतीचे वातावरण आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, येथील स्थानिक रहिवासी वैभव गाडेकर हे सेलू साळेगाव रस्त्याने सायंकाळी सातच्या सुमारास जात होते. यावेळी दोन मोटारसायकलवर वैभव, त्याची आई व दुसऱ्या गादीवर वडील व आणखी एक जण असे चौघे जण जात असताना रस्त्याच्या बाजूलाच त्यांना एक मोठा वाघ दिसला. एकदम वाघ दिसल्याने गाडेकर यांना काहीच समजले नाही व ते पूर्णपणे घाबरून गेले. परंतु प्रसंगावधान राखून त्यांनी आपली गाडी तशीच रायपूर पर्यंत नेली. दरम्यन, या परिसरात वाघाचा शोध सुरु आहे.

आपली प्रतिक्रिया द्या