महाराष्ट्राचे माजी आदिवासी विकासमंत्री आणि ज्येष्ठ नेते मधुकर पिचड यांच्या प्रकृती बिघडली आहे. मधुकर पिचड यांना मंगळवारी पहाटेच्या सुमारास ब्रेनस्ट्रोकचा झटका बसला. त्यामुळे त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर नाशिकच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, मधुकर पिचड यांना अर्धांगवायू झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. नगर जिल्ह्यातील राजूर येथील राहत्या घरी असताना त्यांना ब्रेनस्ट्रोक आला. त्यामुळे त्यांना नाशिकच्या 9 पल्स रुग्णालयात दाखल करण्यात आले. मधुकर पिचड यांचे चिरंजीव वैभव पिचड यांच्यासह त्यांचे कुटुंबीय रुग्णालयात दाखल झाले आहेत.