स्वतंत्र गोरखालॅण्ड हवेच!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, कोलकाता

दार्जिलिंगमध्ये स्वतंत्र गोरखालॅण्ड हवे ही आपली मागणी अजूनही कायम असल्याचे गोरखा जनमुक्ती मोर्चा (जीआयएम) पक्षाचे नेते बिमल गुरुंग यांनी गुरुवारी स्पष्ट केले. सध्या गुप्त स्थानी असलेले गुरुंग अजूनही त्या पक्षाचे अध्यक्ष आहेत.

यंदाची लोकसभा निवडणूक ही पश्चिम बंगाल सरकारची बेबंदशाही मोडून काढण्यासाठीची लढाई असल्याचे आम्ही मानतो, असेही ते म्हणाले. दार्जिलिंगमध्ये 18 एप्रिलला लोकसभेसाठी मतदान होणार आहे. ‘स्वतंत्र गोरखालॅण्ड’ हा मुद्दा यंदाच्या लोकसभा निवडणुकीत नाही असे एकीकडे भाजप आणि तृणमूल काँग्रेस म्हणत असतानाच बिमल गुरुंग यांचे हे वक्तव्य समोर आले आहे.