सिंहस्थ कुंंभमेळ्यात त्र्यंबकेश्वर येथे स्वतंत्र मार्गिका

छत्तीसगढ येथे राजिम कुंभात स्नान केल्यानंतर कुलेश्र्वर महादेवाचं दर्शन घेण्यासाठी भक्तांनी रांग लागली.

नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे होणारा आगामी सिंहस्थ कुंभमेळा सुरक्षित होण्यासाठी गर्दीचे सूक्ष्म नियोजन करावे, त्र्यंबकेश्वर येथे भाविकांना येण्या-जाण्यासाठी स्वतंत्र मार्गिका तयार करा, अशा सूचना राज्याचे मुख्य सचिव राजेशकुमार मीना यांनी केल्या.

राजेशकुमार मीना हे शनिवारपासून नाशिक दौऱयावर आले आहेत. रविवारी सकाळी त्र्यंबकेश्वर येथील कुंभमेळा विकासकामांसह श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर मंदिर परिसर, दर्शन मार्गिका, नियंत्रण कक्षाची पाहणी केली. कुशावर्त परिसरालाही भेट दिली. तेथील उपलब्ध जागा आणि येणाऱया भाविकांची संख्या लक्षात घेता काटेकोर नियोजन आवश्यक असल्याचे ते म्हणाले. साधू, संत, महंत आणि भाविकांना आवश्यक मूलभूत सोयीसुविधा वेळेत उपलब्ध करून देण्याच्या तसेच त्र्यंबकेश्वरकडे येणाऱ्या रस्त्यांचे मजबुतीकरण, वाहनतळासाठी लागणारी जागा, नदीकिनारी बांधण्यात येणारे घाट आदी कामे वेळेत सुरू करून लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना केल्या.