सेरेनाची उपांत्य फेरीत धडक

38

सामना ऑनलाईन | लंडन

इटलीच्या बिगरमानांकीत कॅमिला जीओर्जीची कडवी झुंज ३-६ , ६-३ ,६-४ अशी मोडून काढत अमेरिकेच्या सेरेना विलियम्सने मंगळवारी आपल्या आठव्या विम्बल्डन जेतेपदाकडे कूच केले. महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत धडक मारणाऱ्या सेरेनाला यंदा पहिल्यांदाच जोरदार आव्हानाचा सामना करावा लागला.
अनुभवी सेरेनाला बिगरमानांकीत इटालियन टेनिसपटूने उपांत्यपूर्व लढतीत चांगलेच झुंजवले. पहिला सेट कॅमिलाने ६-३ असा जिंकत स्टार सेरेनाला आश्चर्यात टाकले. पण पुढच्या दोन्ही सेट्समध्ये मात्र सेरेनाच्या तुफानी खेळापुढे नवख्या जीओर्जीची डाळ शिजली नाही.

३६ वर्षीय सेरेनाने आपल्या आठव्या विम्बल्डन विजेतेपदाच्या दिशेने मंगळवारी आणखी एक पाऊल टाकले. सेरेनाची ही ११वी विम्बल्डन स्पर्धा आहे. तिला उपांत्यफेरीत जर्मनीच्या १३ व्या मानांकित जुलिया जॉर्जेस हिच्या आव्हानाचा सामना करावा लागणार आहे. यंदा विम्बल्डनच्या निर्णायक फेरीत मजल मारणारी सेरेना हि एकमेव टॉप मानांकित टेनिसपटू ठरली आहे.

ओस्तापेन्को उपांत्य फेरी गाठणारी पहिली लाटव्हियन

लाटव्हियाच्या १२ व्या मानांकित येलेना ओस्तापेन्कोने महिला एकेरीची उपांत्यफेरी गाठण्याचा पराक्रम केलाआहे. असा पराक्रम करणारी ती पहिली लाटव्हियन टेनिसपटू ठरली आहे. येलेनाने उपांत्यपूर्व फेरीत स्लोवाकियाच्या डोमिनिका सिबूलकोव्हाला ७-५ ,६-४ असे सरळ सेट्समध्ये पराभूत केले.उपांत्यफेरीत माजी फ़्रेंच ओपन विजेत्या ओस्तापेन्कोला माजी विम्ब्लडन उपविजेती अँजेलिक कर्बर हिच्याशी झुंजावे लागणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या