
महादेव मंदिरात दर्शनासाठी चाललेल्या भाविकांना भरधाव ट्रकने चिरडल्याची घटना गुजरातमधील सुरेंद्रनगरमध्य घडली. या अपघातात सात भाविकांचा मृत्यू झाला आहे. हे भाविक राजकोटमधील गढका गावातून डेकावाला येथील महादेव मंदिराकडे जात होते. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली.
एनडीटीव्ही इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, भास्करपारा जवळ लख्तर-विरमगाम महामार्गावर रस्त्याच्या कडेला टायर बदलत असलेल्या डंपरला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात ट्रकने या 10 जणांना धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की, सहा जणांचा जागीच मृत्यू झाला. तर जखमी डंपर चालकाचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. सर्व भाविक राजकोटमधील गढका गावातून डेकावाला येथील महादेव मंदिराकडे जात होते. सर्व मृतदेह शवविच्छेदनासाठी लख्तर शासकीय रुग्णालयात नेण्यात आले आहेत.


























































