
एनव्हिडीयाचे सीईओ जेन्सन हुआंग यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या पदासाठी आता 7 नावे चर्चेत आली आहेत. जेन्सन यांनी पद सोडल्यानंतर एनव्हिडीयाची धुरा कोण सांभाळणार?, असा प्रश्न विचारला जात आहे. या शर्यतीत अॅपलचे माजी सीईओ टिम पुक यांचे नावही चर्चेत आहे. स्वतः अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या नावाची शिफारस केली आहे.
एनव्हिडीयाच्या मुख्य वित्तीय अधिकारी (सीएफओ) कोलेट व्रेस यांची अंतरिम सीईओ म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. कायमस्वरूपी सीईओचा शोध पूर्ण होईपर्यंत त्या पंपनीची जबाबदारी सांभाळतील. एनव्हिडीयाचे नवे सीईओ म्हणून सध्या जी 7 नावे चर्चेत आली आहेत त्यामध्ये कोलेट व्रेस, एनव्हिडीयाचे उपाध्यक्ष इयान बक, अॅपलचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी टिम पुक, अॅपलमधील हार्डवेअर विभागाचे प्रमुख जॉनी सरोजी, रेने हास, फॉरेस्ट नॉररॉड आणि चार्ली कवास यांच्या नावाची चर्चा सुरू आहे.

























































