रेल्वे रुळ ओलांडताना सात जणांना ट्रेनची धडक, दोन ठार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मथुरा

रेल्वे रुळ ओलांडून जात असताना ट्रेनने सात जणांना धडक दिल्याची घटना मथुरा येथे घडली आहे. या घटनेत दोन जणांचा मृत्यू झाला असून पाच जण जखमी झाले आहेत.

मथुरेतील कोसी कालन येथे रेल्वे रुळ ओलांडून दुसऱ्या बाजूकडील ट्रेनमध्ये चढण्यासाठी हे सात जण जात होते. त्यावेळी त्यांना दुसऱ्या बाजूकडील रेल्वेची धडक बसली. या घटनेत एक जण जागीच ठार झाला तर अन्य एक जण रुग्णालयात उपचारांदरम्यान मृत्युमुखी पडला. उर्वरित पाच जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

summery- seven people got hit by train while crossing railway track, two died