विश्वाचे रहस्य उलगडणारे सेव्हन वर्ल्डस्, वन प्लॅनेट

1516

लाखो वर्षांपूर्वी पृथ्वीच्या कवचामधून  सात अद्भुत खंडांची निर्मिती झाली. सोनी बीबीसी अर्थवरील सात भागांच्या सेव्हन वर्ल्डस्, वन प्लॅनेट या मालिकेतून हा अविश्वसनीय प्रवास सादर होत आहे. मालिकेत विशिष्ट खंडातील जैवविविधता आणि प्राणी आदींची माहिती बघायला मिळणार आहे. नॅच्युरल हिस्ट्रीचे गॉडफादर सर डेव्हिड ऍटेनबॉरो यांचे कथाकथन आणि हंस झिमर यांचे संगीत असलेली सेव्हन वर्ल्डस्, वन प्लॅनेट ही जैवविविवधतेवर निर्माण करण्यात आलेली मोठी सीरिज आहे. जगभरातील 1500 हून अधिक लोकांच्या टीमने गेली चार वर्षे 38 देशांमध्ये शूटिंग केले आहे. मालिकेत नावीन्यपूर्ण तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे. ही मालिका पाहताना व्हिज्युअली भव्य व हृदयस्पर्शी दृश्यांचा अनुभव मिळणार आहे. रात्री 9 वाजता सोनी बीबीसी अर्थवर ही मालिका सादर होईल.

आपली प्रतिक्रिया द्या