बिहारमधील मतदार याद्यांमध्ये मोठा घोळ; आढळून आले नेपाळ, म्यानमार, बांगलादेशचे नागरिक

बिहारमध्ये या वर्षाच्या अखेरपर्यंत विधानसभा निवडणूका होणार आहेत. त्यासाठी सध्या सर्व पक्षांनी प्रचारात आपला जोर लावत आहेत. दरम्यान निवडणूकीसाठी निवडणूक आयोगाने मतदार याद्यांचे जे सर्वेक्षण केले आहे त्यातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. या याद्यांमध्ये चक्क नेपाळ, बांग्लादेश व म्यानमार या शेजारील देशाच्या नागरिकांची नावं देखील आढळून आल्याचे समजते. त्यामुळे सध्या बिहारमध्ये एकच खळबळ माजली आहे. सत्ताधाऱ्यांनी बोगस मतदान घडवून आणण्यासाठी अशाप्रकारे मतदार यादींमध्ये नावं वाढवल्याचे बोलले जात आहे.

विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर सध्या मतदार याद्यांसाठी सर्वेक्षण सुरू आहे. त्या सर्वेक्षणादरम्यान अधिकाऱ्यांना हिंदुस्थानात बेकायदेशीररित्या राहणाऱ्या नेपाळी, बांगलादेशी, म्यानमारमधील नागरिकांची नावे देखील या याद्यांमध्ये आढळली आहेत. आता पर्यत 80 टक्के सर्वेक्षण पूर्ण झाले असून ३० सप्टेंबर रोजी अंतिम मतदाता यादी जाहीर केली जाणार आहे.