‘रामायण’ चित्रपटासाठी ‘किंग’ खानने घेतला सावध पवित्रा, वाचा नेमकं काय घडलं?

सध्या बाॅलीवूडमध्ये ‘रामायण’ या रणबीर कपूरच्या चित्रपटाची चर्चा जोरदार सुरु आहे. एकीकडे ‘रामायण’ हा चित्रपट रिलीज होणार म्हणून भल्या भल्या निर्मात्यांनी आपल्या चित्रपटाची तारीख बदलली आहे. तर दुसरीकडे दस्तुरखुद्द किंग खानने रामायण या चित्रपटासाठी त्याच्या ‘किंग’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलली आहे. शाहरुख खानचा बहुप्रतिक्षित चित्रपट ‘किंग’ ची रिलीज डेट अखेर जाहीर झाली आहे. सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित हा चित्रपट 2026 च्या ख्रिसमसला थिएटरमध्ये आपल्या भेटीस येणार आहे.

‘रामायण’ सोबत चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख टाळण्यासाठी शाहरुख खानचा ‘किंग’ चित्रपट हा सावध पवित्रा घेण्याच्या तयारीत आहे. शाहरुख खानचा शेवटचा चित्रपट 2024 मध्ये प्रदर्शित झाला होता. ‘डंकी’ या चित्रपटात आपल्याला किंग खान दिसला होता. त्यानंतर मात्र तो दोन वर्षात दिसला नाही.

येत्या काही महिन्यांमध्ये किंग या चित्रपटाच्या माध्यमातून तो पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर अवतरणार आहे. ‘किंग’ 2026 मध्ये प्रदर्शित होणार हे नक्की झाले आहे. परंतु किंग खान मात्र हा चित्रपट रामायण नंतरच प्रदर्शित करायला हवा यावर मात्र ठाम आहे. म्हणूनच ‘रामायण’ चित्रपटाच्या रिलीजनंतर दीड महिन्यानंतर हा चित्रपट थिएटरमध्ये दाखल होईल.

बॉलिवूड हंगामाच्या वृत्तानुसार, सिद्धार्थ आनंदचा ‘किंग’ हा चित्रपट 2026 च्या ख्रिसमसला थिएटरमध्ये दाखल होणार आहे. महत्त्वाचे म्हणजे, सध्या ख्रिसमसमध्ये रिलीजसाठी कोणतेही मोठे बॉलिवूड चित्रपट नाहीत. त्यामुळेच शाहरुखचा ‘किंग’ बॉक्स ऑफिसवर गाजावाजा करु शकतो. येत्या महिन्याभरात ‘किंग’ चित्रपटाचे निर्माते या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करतील अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे.

‘किंग’च्या प्रदर्शनाबाबत निर्माते 4 डिसेंबर ही तारीख निश्चित करणार होते. परंतु रामायण हा चित्रपट त्याचवेळी प्रदर्शित होत असल्याने, सर्व गोष्टींचा सारासार विचार करुन अखेर 25 डिसेंबर ही तारीख निवडण्यात आली. ‘किंग’ चित्रपटात शाहरुख खान त्याच्या मुलीसोबत म्हणजेच सुहानासोबत दिसणार आहे. सुहाना ‘किंग’ चित्रपटातून मोठ्या पडद्यावर पदार्पण करणार आहे. याशिवाय, दीपिका पदुकोण, अनिल कपूर, राणी मुखर्जी, अभिषेक बच्चन, जयदीप अहलावत, अर्शद वारसी आणि अभय वर्मा असे स्टार्स किंगमध्ये आपल्याला पाहायला मिळतील.