
दिल्लीतील शाहीनबागमध्ये सीएए विरोधातील आंदोलनात गोळीबार करणारा आरोपी कपिल गुर्जर याने भाजपमध्ये प्रवेश केला आहे. गाझियाबाद भाजप प्रदेश कार्यालात बुधवारी कपिल गुर्जरने पक्ष प्रवेश केला. यावर टीका होऊ लागताच भाजपाने रात्री उशीरा त्याला पक्षातून काढून टाकल्याची घोषणा केली.
दिल्लीतील शाहीन बाग येथे सीएए आणि एनआरसी विरोधात झालेल्या आंदोलना दरम्यान मोठी दंगल उसळली होती. यावेळी कपिल गुर्जरने दविसाढवळ्या गोळीबार केला होता. त्यानतर या प्रकरणात दिल्ली पोलिसांनी त्याला अटक केली होती. सीएएच्या विरोधकांना पांगवण्यासाठी त्याने हा गोळीबार केल्याचे समोर आले होते. या प्रकरणात त्याची दिल्लीच्या साकेत कोर्टाने 25 हजारांच्या जामिनावर सुटका केली होती.
दिल्ली पोलिसांनी कपिल गुर्जर याची गुन्हेगारी पार्श्वभूमी लक्षात घेता त्याच्या जामीन अर्जाला कडाडून विरोध दर्शविला होता. तसेच त्याच्यावरील आरोप गंभीर असून या प्रकरणाची कसून चौकशी व्हावी असे मत मांडले होते. दिल्ली दंगलीतील आरोपीला भाजपने पावन करून घेतल्याने राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
दरम्यान कपिल गुर्जर यांने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी आपलं जुन नात असून भाजपं हा हिंदुत्वासाठी काम करणारा पक्ष असल्याने पक्ष प्रवेश केल्याचे म्हटलं आहे.
वादग्रस्त फेसबुक पोस्ट
शाहीनबाग दंगलीच्यावेळी कपिल गुर्जर याने केलेल्या ‘शाहीन बाग खेल खतम’ या त्याच्या पोस्टवरून मोठा गदारोळ उडाला होता. ‘हमारे देश में सिर्फ हिंदुओंकी चलेगी और किसी की नही चलेगी’, ही पोस्टही त्याने दंगली दरम्यान केली होती. दंगली दरम्यान अनेकदा फेसबूक लाईव्ह करून धार्मिक तेढ निर्माण करण्याचा आरोपही त्याच्यावर आहे.


























































