शौचालयात रक्त दिसल्याने विद्यार्थीनींची कपडे काढून तपासणी, शहापूरच्या दमानी शाळेतील धक्कादायक प्रकार

शहापूरच्या आर एस दमानी शाळेमध्ये एक संतापजनक प्रकार समोर आला आहे. शाळेतील शौचालयात रक्त सापडल्याने कोणत्या मुलीला मासिका पाळी आली आहे हे तपासण्यासाठी चक्क विद्यार्थिनींची कपडे काढून तपासणी करण्यात आली आहे. सहावी ते दहावीच्या विद्यार्थीनींसोबत हा प्रकार घडला आहे. याबाबत मुलींनी आपल्या पालकांकडे तक्रार केल्यानंतर पालकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे.

दरम्यान बुधवारी संतप्त पालकांनी शाळेकडे धाव घेत प्रिन्सिपलला घेराव घालून जाब विचारला.