
हातकणंगले तालुक्यातील अतिग्रे येथील ऐतिहासिक शाहू तलावाच्या संवर्धन व सुशोभीकरणाबाबत आठ दिवसांत बैठक घेऊन दोन महिन्यांच्या आत तलाव संवर्धनाचे काम सुरू करणार असल्याची घोषणा पर्यावरण व पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी केली आहे.
अतिग्रे येथील ऐतिहासिक शाहू तलावाचे संवर्धन करून सुशोभीकरण करण्यासाठी 24 कोटी 85 लाख रुपयांचा प्रस्ताव पर्यटन विभागाकडे पाठवलेला आहे. तो मंजूर करून निधी उपलब्ध करण्याची मागणी खासदार धैर्यशील माने यांनी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे केली होती. या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे यांनी खासदार माने यांच्यासमवेत या तलावाची पाहणी केली.
यावेळी अतिग्रेचे सरपंच सागर पाटील, पांडुरंग पाटील, प्रशांत गुरव, जयवंत पाटील, दीपक पाटील, विद्याधर लाटवडेकर, धनाजी पाटील, नीलेश पाटील, शशिकांत पाटील, आनंद पाटील, धुळोबा पाटील, संतोष कांबळे, किशोर बोरगावे, प्रवीण पाटील, भगवान पाटील, अविनाश बनगे, बबलू मकानदार, अमोल लोखंडे, अरविंद खोत, कार्तिक स्वामी, सारंग पाटील यांच्यासह अतिग्रे व रुकडी पंचक्रोशीतील शिवसैनिक, युवासैनिक व ग्रामस्थ मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
























































