शनिशिंगणापुरात चोरी; चालकाला अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उत्तर प्रदेश येथील भाविकाच्या गाडीतून पैसे चोरीला गेल्याची घटना शनिशिंगणापूर येथे घडली आहे. पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केल्यानंतर गाडीच्या चालकानेच पैसे चोरल्याचे उघड झाल्याने पोलिसांनी चालकाला अटक केली आहे.

भाऊसाहेब पोपट कोळपे असे अटक केलेल्या चालकाचे नाव आहे. तरुण खेमचंद मोटवाणी (वय 34, रा. वाराणसी, उत्तर प्रदेश) यांनी फिर्याद दिली आहे.

तरुण मोटवाणी हे शनिदर्शनाकरिता इनोव्हा क्रिस्टा गाडी भाडेतत्त्वावर घेऊन शनिशिंगणापूरला आले होते. दर्शनासाठी जात असताना त्यांनी बॅग व इतर सामान गाडीतच ठेवलेले होते. दर्शन करून आल्यानंतर बॅगेतील 30 हजार रुपये नसल्याचे लक्षात आल्याने त्यांनी चालक कोळपे याला विचारणा केली. मात्र, त्याने उडवाउडवीची उत्तरे दिल्याने मोटवाणी यांनी शनिशिंगणापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. सहायक पोलीस निरीक्षक रामचंद्र कर्पे यांनी कोळपे याला विश्वासात घेऊन चौकशी केली असता त्याने गुन्हा केल्याची कबुली देत गाडीत लपवलेले पैसे काढून दिले. पोलिसांनी गाडी आणि 30 हजार रुपये असा, 15 लाख 30 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.