Bihar Election 2025 – शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद बिहार निवडणुकीत 243 जागांवर उमेदवार उभे करणार!

बिहार निवडणुकीची चर्चा गेल्या दोन महिन्यांपासून सुरू आहे. महाराष्ट्रानंतर बिहारमध्ये झालेल्या फेरतपासणीच्या नावाखाली अनेक घोळ घालण्यात आले. बिहार निवडणुकीतील हे प्रकरण ताजे असताना धार्मिक विचारांमुळे ओळखले जाणारे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती महाराज एका निर्णयामुळे चर्चेत आले आहेत. त्यांनी बिहारच्या राजकारणाला एक नवी दिशा देणार असल्याची घोषणा केली आहे. त्यामुळे सध्या बिहारमध्ये त्यांची प्रचंड चर्चा सुरू आहे.

बिहार निवडणुकीत गोमातेचे रक्षण करणे हा त्यांचा सर्वात महत्त्वाचा उद्देश असणार आहे. बिहारमधील देशी गायी जवळजवळ नामशेष होऊ लागल्या आहेत. त्यामुळे या संकटाला तोंड देण्यासाठी ते पारंपरिक पद्धतींचा अवलंब न करता एक नवीन राजकीय प्रयोग करत आहेत. त्यामुळे “आता मतदारांनी पुढे येऊन गायींचे रक्षण करण्यासाठी मतदान केले पाहिजे”, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. बिहारमध्ये निवडणुकीचे वातावरण निर्माण झाल्याने तेथील प्रमुख पक्ष, एनडीए आणि महाआघाडी, आपापल्या रणनीती आखत असताना ही घोषणा करण्यात आली आहे.

दरम्यान, याबाबत घोषणा करत असताना त्यांनी अनेक गोष्टी स्पष्ट केल्या आहेत. माझा कोणताही राजकीय पक्ष नाही. तसेच मी कोणत्याही पक्षाशी युती करणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. तसेच बिहारमधील सर्व 243 विधानसभा जागांवर स्वतंत्र उमेदवार उभे करण्याची योजना ते आखत आहेत. ‘प्रत्येक मतदारसंघातून गोरक्षणासाठी समर्पित एक उमेदवार निवडला जाईल. आत्तापर्यंत सत्तेत असलेल्या कोणत्याही पक्षाने या मुद्द्यावर ठोस पाऊल उचललेले नाही. त्यामुळे हा एक विरोधाचा भक्कम केंद्रबिंदू ठरू शकतो, असे ते म्हणाले.

बिहार निवडणूक कधी होणार?
निवडणूक आयोगाने बिहार निवडणुकीच्या तारखा अद्याप जाहीर केलेल्या नाहीत. तरी, त्या 6 ऑक्टोबरपर्यंत जाहीर होणे अपेक्षित आहेत.

महाराष्ट्रानंतर बिहारमध्येही मतदार यादीचा झोल; फेरतपासणीला इंडिया आघाडीने घेतला आक्षेप;निवडणूक आयुक्तांसोबत तीन तास वादळी चर्चा