
‘नाजूका’ फेम शांताबाई कृष्णा कांबळे यांचे आज वयाच्या 100 व्या वर्षी निधन झाले. ‘माझ्या जन्माची चितार कथा’ या मुंबई दूरदर्शन वर 1987-88 दरम्यान गाजलेल्या मालिकेच्या आत्मचरित्र लेखिका व त्या कथेतील ओरिजनल पात्र ‘नाजुका’ तसेच पॅथर संस्थापक व आंबेडकरी विचारधारेचे व्याख्याता कालकथीत प्रा. अरुण कांबळे यांच्या त्या मातोश्री होत. मुळच्या सांगली जिल्ह्यातील शांताबाई कांबळे या सध्या त्यांची कन्या आयु. मगंल नारायण तिरमारे यांच्या समवेत औंध पुणे येथे राहत होत्या. त्यांच्या निधनाचे वृत्त कळताच समस्त सांगली जिल्ह्यातील आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांनी आदरांजली वाहिली.