ललित प्रभाकरची शांतीत क्रांती!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आपण जीवनामध्ये पुढे जात असताना खरे मित्र आपले आधारस्तंभ बनतात, आपल्या अनुभवांमध्ये मोलाची भर करतात, आपले जीवन अविरत आठवणींनी भरून टाकतात. मैत्रीच्या या अतूट नात्यावर  सोनीलिव्हवर आजपासून मराठी ओरिजिनल ‘शांतीत क्रांती’ सिरीज भेटीला येत आहे. यात श्रेयस, दिनार व प्रसन्न या तीन जिवलग मित्रांची कथा दाखवण्यात आली आहे. अनुक्रमे अभय महाजन, ललित प्रभाकर आणि आलोक राजवाडे यांनी या भूमिका साकारल्या आहेत. एक साधी रोड ट्रिप त्यांच्या आयुष्यात मोठे बदल घडवून आणते. ती त्यांना आत्मपरीक्षण करण्यासाठी आणि आयुष्यातील कधीही न अनुभवलेल्या गोष्टी अनुभवण्याची संधी देते. सारंग साठये व पौला मॅकग्लीन दिग्दर्शित ‘शांतीत क्रांती’ ही सिरीज हिंदी, तमिळ, तेलुगू व मल्याळममध्ये डब केली आहे.