पंतप्रधान मोदींना शेतकर्‍यांसाठी वेळ नाही पण कोलकात्यासाठी वेळ आहे, शरद पवार यांची टीका

 

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांन शेतकर्‍यांसाठी वेळ नाही, पण कोलकाताला जाण्यासाठी वेळ आहे अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि खासदार शरद पवार यांनी केली अहे. तसेच भाजपने देशात धार्मिक द्वेष पसरवला असेही पवार म्हणाले.

रांचीमध्ये पवार म्हणाले की, “देशात एकता निर्माण व्हावी ही केंद्र सरकारची जवाबदारी आहे. पण भाजपने देशात धार्मिक पसरवला आहे. गेल्या 100 दिवसांपासून शेतकरी आंदोलन करत आहेत. पण पंतप्रधान मोदी यांना शेतकर्‍यांनी भेटण्यासाठी वेळ नाही. पंतप्रधान मोदी यांना कोलकात्यात प्रचारासाठी वेळ आहे.’’

गेल्या 100 दिवसांपासून शेतकरी दिल्लीच्या सीमा भागात आंदोलन करत आहेत. केंद्र सरकारने तीन कृषी कायदे पास केले आहेत. हे कायदे मागे घ्यावेत अशी मागणी शेतकर्‍यांनी केली आहे. केंद्र सरकारने हे कायदे मागे घेण्यास नकार दिल्याने शेतकर्‍यांनी आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनात अनेक शेतकर्‍याचा मृत्यूही झाला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या