शेअर इट भाग १७- शेअर बाजारातील गुंतवणुकीसाठी खास टिप्स

259
mumbai share market

mahesh-chavan-th>>महेश चव्हाण (अर्थ नियोजन सल्लागार आणि शेअर्स मार्केट तज्ज्ञ)

TTK Prestige Ltd.:- टिटीके प्रेस्टीज लिमिटेड

सध्याची किंमत :- ६१८५.०० रुपये

कंपनीविषयी माहिती :- टीटीके ग्रुपची स्थापना १९२८ साली एक एजन्सी म्हणून झाली. आपल्या घरी प्रेस्टीज प्रेशर कुकर, नॉन स्टिक पॅन व इतर वस्तू नक्कीच वापरात असतील. पण या कंपनीची सुरुवात श्री टी.एस. कृष्णामाचारी यांनी हिंदुस्थानात विविध फूड, पर्सनल केअर प्रॉडक्ट्स, लेखन साधनांपासून एथिकल उत्पादनांपर्यंत विविध प्रकारच्या उत्पादनांचे वितरण करून झाली .कॅडबरी, मॅक्सफॅक्टर, किवी, क्राफ्ट, सनलाईट, लाइफबॉय, लक्स, पॉंड्स, ब्रिलक्रिम, केलॉग, ओव्हलटिन, हॉर्क्स, मॅक्लीन, शेफेर, वॉटरमॅन आणि बरेच काही अशा विविध ब्रॅण्डसाठी वितरणाचे काम केले आहे. उत्पादनाची गुणवत्ता आणि त्याची वाढती मागणी या कंपनीसाठी नक्कीच फायदेशीर ठरत राहील

भविष्यातील अंदाजित किंमत :- ७४५०.०० रुपये

AU Small Finance Bank:- एयू स्मॉल फायनान्स बँक

सध्याची किंमत :- ६५५ रुपये

कंपनीविषयी माहिती :- १९९६ ला फक्त वाहन कर्ज देण्यासाठी स्थापित झालेली ही छोटीशी कंपनी आज स्मॉल फायनान्स बँक म्हून नावरूपला आली आहे. २०१७ साली हिंदुस्थानी स्टॉक मार्केट मध्ये प्रवेश झाला. स्टॉक मार्केटमध्ये पहिल्याच दिवशी ५१% नफा तिने ग्राहकांना दिला. स्मॉल फायनान्स बँक झाल्यामुळे आता छोट्या प्रमाणात ग्राहकांना बँकिंग सेवा पुरवत आहे. ३०१ शाखा असलेली ही बँक २०१८ वर्षामध्ये ४३० पर्यंत आकडा नेईल, असा त्यांच्या सीईओचा संकल्प आहे.

भविष्यातील अंदाजित किंमत :- ९०० रुपये

Godrej Industries :-गोदरेज इंडस्ट्रीएस

सध्याची किंमत :- ६२३ रुपये

कंपनीविषयी माहिती :- आपल्या रोजच्या जीवनाचा भाग असलेली ही कंपनी आहे. साबण ते बिस्कीट आणि कुलूप ते फ्रिज या सगळ्या गोष्टी बनवणारी कंपनी म्हणजे गोदरेज. गोदरेज इंडस्ट्रीजचा प्रमुख काम हेऑलेकेमिकल्स बनवणं आहे. आता गोदरेज प्रॉपर्टीज नावाने रिअल इस्टेट क्षेत्रात मध्ये आपला नाव जमवत आहे.

भविष्यातील अंदाजित किंमत :- ८०० रुपये

आपली प्रतिक्रिया द्या