
आठवड्याची सुरुवात 1000 अंकांच्या वाढीसह झाल्यानंतर शेअर बाजाराचा निर्देशांक काल तिसर्या दिवशी 503.62 अंकांनी घसरून तो 38,593.52 वर पोहचला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीतही 148 अंकांची घसरण होऊन तो 11,440 अंकांवर बंद झाला. अमेरिकेतील राजकीय अस्थिरता आणि गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणावर केलेल्या विक्रीमुळे शेअर बाजार लुढकला. गेल्या आठवड्यात आणि या आठवड्याच्या सुरुवातीला शेअर बाजारात अक्षरशः दिवाळीचे वातावरण होते.
अमेरिका-चीनमधील व्यापारयुद्धाचा परिणाम
अमेरिका आणि चीनमध्ये सुरू असलेल्या व्यापारयद्धाचाही परिणाम शेअर बाजारावर दिसला. ट्रंप यांनी चीनवर सातत्याने टीका केली. जागतिक व्यापार संघटनेत सामील होताना चीनने दिलेली आश्वासने त्यांना पूर्ण करता आली नाहीत. दरम्यान, या दोन्ही देशांदरम्यान अद्याप व्यापाराच्या दृष्टीने कुठल्याही प्रकारचा करार होऊ शकलेला नाही.
या कंपन्यांच्या शेअर्समध्ये तेजी
पावरग्रीड, टीसीएस, एनटीपीसी, एचसीएल, टेक महिंद्रा,आयओसी तसेच एचसीएल टेक या कंपन्यांच्या शेअर्समध्ये तेजी दिसली. बीएसईच्या 6 कंपन्यांचा निर्देशांक हिरव्या चिन्हावर बंद झाला तर 24 कंपन्यांचा निर्देशांक लाल चिन्हावर बंद झाला. दुसरीकडे एनएसईच्या 13 कंपन्यांच्या शेअर्सची खरेदी आणि 37 कंपन्यांच्या शेअर्सची विक्री नोंदवली गेली.





























































