सौदी तेलसंकटाने केला घात, शेअर बाजारात ‘अमंगळवार’

318
share-market-fall

सौदी अरेबियातील तेलसाठय़ांवर येमेन बंडखोरांनी केलेल्या हल्ल्याचे पडसाद मंगळवारी शेअर बाजारात उमटले. सौदीच्या तेलसंकटाने घात केल्यामुळे सेन्सेक्स 642.22 अंकांनी घसरून 36,481.09 च्या पातळीवर आपटला, तर निफ्टीने 185.90 अंकांच्या घसरणीने 10,817.60 ची पातळी गाठली. शेअर बाजार गडगडल्याने गुंतवणूकदारांनी कपाळावर हात मारून घेतला.  दिवसाअखेर 858 शेअरमध्ये तेजी, 1641 शेअरची घसरण तर 143 शेअरमध्ये कोणतीच प्रगती झाली नाही.   

चौथा बूस्टर डोस

मंदीत सापडलेल्या अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी केंद्र सरकारने आणखी एक बूस्टर डोस देण्याची तयारी केली आहे. आर्थिक विकासदर गेल्या साडेसहा वर्षांतील नीचांकी पातळीवर आला असून त्याला पुन्हा ट्रकवर आणण्यासाठी अर्थ मंत्रालयाने पावले उचलली आहेत. त्यावरील उपाययोजनांचा मसुदा तयार होत असून अर्थमंत्री निर्मला सीतारमन लवकरच त्याबाबत घोषणा करतील असे सांगण्यात आले. आर्थिक मंदीतून सावरण्यासाठी सरकारने यापूर्वी 23 दिवसांत तीन बूस्टर डोस दिले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या