Stock Market news  – शेअर मार्केट सुस्साट; आठवड्याभरात लिस्ट होणार 10 IPO

शेअर बाजारात पुन्हा तेजीचे दिवस आले आहेत. गेल्या काही दिवसांपासून मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स आणि राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी यात मोठी वाढ झाली आहे. मंगळवारी सेन्सेक्समध्ये 594 हून अधिक अंकाची वाढ झाली आणि तो 82,350 पार पोहोचला. दुसरीकडे निफ्टी 50 देखील 160 हून अधिक अंकांनी वधारून 25,225 पार गेला. बुधवारीही हाच कल कायम राहिला आणि सेन्सेक्स 313 तर निफ्टी 91 अंक वधारला. या तेजीमुळे गुंतवणूकदारांची चांदी झाली आहे. याच तेजीचा फायदा घेण्यास अनेक कंपन्या उत्सुक असून एकामागोमाग अनेक कंपन्यांचे IPO लिस्ट होणार आहेत. त्यामुळे गुंतवणूकदारांनी कमाईची चांगली संधी आहे.

कोणते IPO होणार लिस्ट?

Ganesh Consumer Product Ltd  – ही कंपनी IPO द्वारे 136 कोटी रुपये उभारत आहे. शेअरची किंमत 306 ते 322 दरम्यान असून हा IPO गुंतवणुकीसाठी 22 ते 24 सप्टेंबर दरम्यान ओपन असेल.

Atlanta Electric ltd – बाजारातून 687 कोटी गोळा करण्याचे उद्दिष्ट या कंपनीचे आहे. या कंपनीचा IPO 22 ते 24 सप्टेंबर काळात गुंतवणूक करायला ओपन असणार आहे. शेअर किंमत 718 ते 754 दरम्यान ठेवण्यात आली आहे.

GK energy ltd – एनर्जी क्षेत्रातील या कंपनीने 400 कोटींच्या उभारणीसाठी IPO आणला असून याची किंमत 145-153 रुपयांदरम्यान आहे. 19 सप्टेंबर ते 23 सप्टेंबर काळात यात गुंतवणूक करता येईल.

Saatvik Green Energy – सोलर एनर्जी क्षेत्रातील या कंपनीचा IPO 19 te 23 सप्टेंबर काळात गुंतवणुकीसाठी ओपन असणार आहे. 900 कोटी रुपयांच्या उभारणीसाठी कंपनीने IPO आणला असून याची किंमत 442-465 दरम्यान आहे.

iValue Infosolutions – सायबर सुरक्षा क्षेत्रातील ही कंपनी IPO द्वारे 560 कोटी उभारत आहे. 18 ते 22 सप्टेंबर काळात यात गुंतवणूक करता येईल आणि शेअर किंमत 284-299 दरम्यान आहे.

Jinkushal Industries – कन्स्ट्रक्शन क्षेत्रातील ही कंपनी IPO द्वारे 116 कोटी रुपये उभारत आहे. शेअरची किंमत 115-121 दरम्यान असून 25 सप्टेंबर रोजी हा IPO गुंतवणुकीसाठी ओपन होईल. 29 सप्टेंबर पर्यंत यात गुंतवणूक करण्याची संधी आहे.

DSM Fresh Food ltd – ही कंपनी IPO द्वारे 59 कोटी रुपये उभारत आहे. शेअर किंमत 96 ते 101 दरम्यान असून 26 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर काळात यात गुंतवणूक करता येईल.

(टीप – ही फक्त माहिती असून गुंतवणुकीचा सल्ला नाही. कोणतीही गुंतवणूक करण्याआधी तज्ञांचा सल्ला नक्की घ्या)