शेअर मार्केट सोमवारी जोरदार कोसळल्याने जगभरातील अब्जाधीशांना मोठा झटका बसला. जगातील टॉप-15 अब्जाधीशांपैकी सहा अब्जाधीशांच्या संपत्तीत सहा अब्ज डॉलरपेक्षा अधिक घसरण झाली. अंबानी आणि अदानी यांचा विचार केला तर दोघांच्या संपत्तीत 86 हजार कोटींपेक्षा जास्त घट झाली.
आशियाई अरबपतींमध्ये सर्वात जास्त नुकसान काल गौतम अदानी यांच्या नेटवर्थमध्ये दिसून आले, तर जगभरात जेफ बेजोस यांचे खूप मोठे नुकसान झाले. गौतम अदानी यांचा विचार करता ब्लूमबर्ग बिलेनियर इंडेक्सच्या आकड्यांनुसार, 6.31 अब्ज डॉलर म्हणजे सुमारे 53 हजार कोटी रुपये नुकसान झाले. परिणामी त्यांची एकूण संपत्ती 104 अब्ज डॉलर झाली.
ब्लूमबर्ग बिलेनियर इंडेक्सनुसार, सोमवारी शेअर मार्पेट आपटल्याने 36 अब्जाधीशांची संपत्ती घसरली. मात्र त्याचवेळी 37 अब्जाधीशांच्या संपत्तीत ना वाढ झाली, ना घसरण झाली. याचा अर्थ जगभरातील 500 अब्जाधीशांपैकी 427 अब्जाधीश यांच्या नेटवर्थमध्ये घट झाली.
जगभरातील अब्जाधीशांच्या संपत्तीत घट
जगभरातील टॉप अब्जाधीशांमध्ये एलन मस्क यांच्या संपत्तीचे सोमवारी 6.29 अब्ज डॉलरचे नुकसान झाले. जेफ बेजोस यांचे 6.66 अब्ज डॉलर नुकसान झाले. बर्नार्ड अरनॉल्ट 1.17 अब्ज डॉलर, मार्प झुकेरबर्ग 4.36 अब्ज डॉलर, बिल गेट्स 3.57 अब्ज डॉलर एवढे नुकसान झालेय.