बेवारस मृतदेहांवर अंत्यसंस्कार करणाऱ्या मोहम्मद शरीफ चाचांना पद्मश्री

695

गेल्या 27 वर्षात पाच हजाराहून अधिक बेवारस मृतदेहांवर अंत्यसंस्कार करणाऱ्या अयोध्येतील मोहम्मद शरीफ (80) चाचांना केंद्र सरकारकडून पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. मोहम्मद शरीफ यांचा आज प्रजासत्ताक दिनानिमित्त अयोध्येत सत्कार करण्यात आला. हा पुरस्कार म्हणजे आपण गेल्या 27 वर्षात केलेल्या कामाची पोचपावती असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.


’27 वर्षांपूर्वी माझा मुलगा रईस याची सुल्तानपूर येथे हत्या करण्यात आली होती. जवळपास महिनाभर पोलिसांनी त्याचा शोध घेतला पण तो कुठेही सापडला नाही. महिनाभराने पोलिसांना रईसचे कपडे सापडले. ते कपडे रईसचेच असल्याचे शरीफ चाचांनी ओळखले मात्र तोपर्यंत बेवारस मृतदेह म्हणून त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले होते. मुलाच्या मृत्युचा मला जबरदस्त धक्का बसला होता तसेच मुलावर धर्मानुसार अंत्यसंस्कार झाले नाहीत याचेही मला वाईट वाटले होते. त्यामुळे त्यानंतर मी बेवारस मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याचा वसा उचलला’, असे शरीफ चाचा सांगतात.

शरीफ चाचांनी गेल्या 27 वर्षांपासून 3000 हिंदू व 2500 मुस्लीम बेवारस मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले आहेत आहेत. ते दोन्ही धर्माच्या पूर्णविधीवत मृतदेहांवर अंत्यसंस्कार करतात. त्यांच्या या महान कार्याची दखल घेत सरकारने त्यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर केला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या