
बांगलादेशातील सैन्याचे प्रमुख जनरल वाकर उज जमान यांचा पक्ष आता कट्टरपंथी इस्लामी पक्षांना पाठिंबा देत असल्याचे समोर आले आहे. यात जमात ए इस्लामी, इस्लामी आंदोलन बांगलादेश, खिलापत मजलीस, मुताहिदे मजलीस ए अमल आणि तंजीमूल उलेमा यांसारख्या पक्षांचा समावेश आहे. तर पळ काढावा लागलेल्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांचा पक्ष अंतर्गत आव्हानांचा सामना करण्यात गुंतला आहे. त्यामुळे हा पक्ष निवडणूक मैदानातून बाहेर गेल्याचे समोर आले आहे.