नाटककार शेखर ताम्हाणे यांच्या स्मृतींना उजाळा

प्रसिद्ध नाटककार शेखर ताम्हाणे यांचे नुकतेच कोरोनाने निधन झाले. शेखर ताम्हाणे यांचे ‘सविता दामोदर परांजपे’ हे नाटक खूप गाजले होते. ‘तू फक्त हो म्हण’, ‘तिन्ही सांज’, ‘वेलकम जिंदगी’ या नाटकांचेही लेखन केले होते. त्यांच्या स्मृती जागवण्यासाठी मराठी नाटक समूहातर्फे ‘आठवणीतले शेखर’ हा ऑनलाईन कार्यक्रम बुधवारी सादर होणार आहे.

या कार्यक्रमात प्रशांत दामले, पुरुषोत्तम बेर्डे, चंद्रकांत कुलकर्णी, डॉ. गिरीश ओक, राजन ताम्हाणे, स्वाती चिटणीस, विजय केंकरे, हृषीकेश जोशी, सविता प्रभुणे, संजय मोने, प्रदीप कबरे, संपदा कुलकर्णी-जोगळेकर, राजीव जोशी, प्रेमानंद गज्वी, आशीर्वाद मराठे आदी सहभागी होणार आहेत.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालक श्रीनिवास नार्वेकर आहेत. ‘आठवणीतले शेखर’ हा कार्यक्रम 12 मे रोजी सायंकाळी 5.45 वाजता मराठी नाटक समूहाच्या फेसबुक पेजवर प्रक्षेपित होईल.

आपली प्रतिक्रिया द्या