
सामना प्रतिनिधी । मुंबई
शेमारू एंटरटेन्मेंट लिमिटेडने नुकतेच ‘शेमारुमी’ या आपल्या ओव्हर द टॉप मंचाचे उद्घाटन केले. बॉलीवूड सेन्सेशन टायगर श्रॉफच्या उपस्थितीत मुंबईत पार पडलेल्या एका सोहळ्यात ही सेवा प्रेक्षकांसाठी खुली करण्यात आली. ‘शेमारुमी’ हे एक सर्वसमावेशक ऍप आहे. बॉलीवूड, गुजराती, भक्तिपर कार्यक्रम, पंजाबी आणि बालमनोरंजन या विभागांतील हिंदुस्थानीय व्हिडीओ कंटेंन्टच्या शोधात असलेल्या प्रेक्षकांना येथे वैविध्यपूर्ण आणि इतरत्र पाहता येणार नाही असे खास चित्रपट व कार्यक्रम उपलब्ध होतील, जिथे प्रत्येक वयोगटासाठी त्यांच्या आवडीने मनोरंजन असेल. स्वतंत्र गटासाठीच्या प्लॅनची उद्घाटनपर किंमत मासिक रुपये 49/- ते वार्षिक रुपये 499/- इतकी असेल.


























































