खामेनींच्या मृत्यूचे हिंदुस्थानमध्ये पडसाद; जम्मू-काश्मीरच्या श्रीनगरमध्ये निदर्शने, फोटो उंचावत घोषणाबाजी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

इस्रायल-अमेरिकेच्या हल्ल्यामध्ये इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांचा मृत्यू झाला. याचे पडसाद हिंदुस्थानमध्ये उमटले असून जम्मू-काश्मीरमध्ये हजारो शिया मुस्लीम रस्त्यावर उतरले आहेत. श्रीनगरच्या लाल चौकामध्ये खामेनी यांचे पोस्टर हातात घेऊन घोषणाबाजी केली जात आहे. खामेनी झिंदाबाद… अमेरिका-इस्रायल मुर्दाबाद अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. याचा व्हिडीओ समोर आले आहेत.

जम्मू-काश्मीरची राजधानी श्रीनगरमध्ये इराणचे सर्वोच्च नेते खामेनी यांच्या निधनानंतर तीव्र संताप पाहायला मिळत आहे. शिया समुदायातील लोकांनी रस्त्यावर उतरून अमेरिका-इस्रायलच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. खामेनी यांच्या मृत्यूचा निषेध व्यक्त करण्यासाठी लोक मोठ्या संख्येने एकत्र आले आहेत.

निदर्शन करणाऱ्या लोकांमध्ये प्रचंड संताप दिसून येत असून ते अमेरिकेचा तीव्र घोषणाबाजी सुरू आहे. रहबर तेरे खून से इंकलाब आएगा.. अशा घोषणा देण्यात येत आहेत. हजारोच्या संख्येने जमलेल्या लोकांमध्ये इराणच्या सर्वोच्च नेत्याच्या निधनाबद्दल स्पष्टपणे संताप दिसत आहे. यावेळी आंदोलकांनी “एक से बढ़कर एक जलील, अमेरिका-इस्रायल” अशा घोषणाही दिल्या. तसेच जो अमेरिकेचा मित्र आहे, तो गद्दार आहे, असेही आंदोलक यावेळी म्हणाले.

जम्मू-काश्मीरच्या ऐतिहासिक लाल चौकात लोकांची मोठी गर्दी झाली आहे. यामध्ये पुरुष आणि तरुण आपल्या हातात खामेनी यांचे फोटो घेऊन सहभागी झाले आहेत. कश्मीरच्या विविध भागांत या घटनेनंतर तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे. लोक मोठ्या संख्येने घराबाहेर पडून रस्ते आणि इमामवाड्यांमध्ये जमून निदर्शने करत आहेत.