
मावळते वर्ष व नवीन वर्षाची सुरुवात साईंच्या चरणी करण्यासाठी आलेल्या लाखो भाविकांनी गेल्या 11 दिवसात 17 कोटी 42 लाखाचे दान अर्पन केले. गेल्या वर्षीच्या तुलनेत हे दान तीन कोटीने अधिक आहे यात 1213 ग्रॅम सोने व १७ किलो चांदी व परकीय चलनाचा समावेश असून आठ लाख 23 हजार भक्तांनी साईदर्शन घेतले.
नाताळ सुट्टी, चालू वर्षाला निरोप व नवीन वर्षाचे स्वागतानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या शिर्डी महोत्सवाच्या दिनांक 23 डिसेंबर 2019 ते दिनांक 02 जानेवारी 2020 याकालावधीत सुमारे 8.23 लाख साईभक्तांनी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले तर याकालावधीत सुमारे 17.42 कोटी रुपये देणगी प्राप्त झाली असल्याची माहिती संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक मुगळीकर यांनी दिली.
मुगळीकर म्हणाले, नाताळ सुट्टी, चालू वर्षाला निरोप व नवीन वर्षाचे स्वागतानिमित्त दिनांक 23 डिसेंबर 2019 ते दिनांक 02 जानेवारी 2020 याकाळात आयोजित करण्यात आलेल्या शिर्डी महोत्सवाच्या कालावधीत 8 लाख 23 हजार 379 साईभक्तांनी साईदर्शनाचा लाभ घेतला.या दरम्यान 16,93,37,370.69/- रुपये देणगी रक्कम स्वरुपात प्राप्त झालेली आहे. तसेच सोने 1213 ग्रॅम (रुपये 4,23,522/-) व चांदी 17223 ग्रॅम (रुपये 5,80,764/-) देणगी प्राप्त झालेली आहे. ऑनलाईन व सशुल्क दर्शन/आरती पासेसव्दारे 4,08,69,400/- रुपये प्राप्त झालेले आहे. तसेच याकालावधीत श्री साईप्रसादालयात 8,11,586 साईभक्तांनी प्रसाद भोजनाचा लाभ घेतला व 1,47,102 साईभक्तांनी अन्नपाकीटांचा लाभ घेतला. याबरोबरच 7,08,794 लाडु प्रसाद पाकीटांची विक्री करण्यात आली असून याव्दारे 1,77,9,850/- रुपये प्राप्त झाले आहे. तर 8,97,000 मोफत बुंदी प्रसाद पाकीटांचे दर्शनरांगेतून साईभक्तांना वाटप करण्यात आले.

























































