
शिरोळात शिवसेनेच्या आमदार उल्हास पाटील यांच्या जनाशीर्वाद सायकल रॅलीला मंगळवारी नृसिंहवाडी येथून प्रारंभ झाला. तालुक्यातील प्रत्येक गावात रॅली जाणार असल्याची माहिती आमदार उल्हास पाटील यांनी दिली.
शिरोळ तालुक्याला विधानसभेचे वेध लागले आहेत. येथे शिवसेनेचे विद्यमान आमदार उल्हास पाटील यांनी जणआशीर्वाद रॅलीला सुरुवात केलीय. आज मंगळवार सकाळी श्रीक्षेत्र नृसिंहवाडी येथे श्री दत्त मंदिरात अभिषेक संकल्प करून सहपत्नीक श्रींचे दर्शन घेतले. शिवसेना जिल्हा प्रमुख मुरलीधर जाधव यांच्या सह मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवून सायकल रॅलीस प्रारंभ झाला. आमदार उल्हास पाटील, तालुका प्रमुख सतीश मलमे, उपजिल्हाप्रमुख मधुकर पाटील, रेखा जाधव, नागेश हिरेमठ, पराग पाटील यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. महापुरातील जनतेला भेटून त्यांना दिलासा देत त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी रॅली काढल्याचे आमदार उल्हास पाटील यांनी सांगितले.
त्यानंतर जनाशीर्वाद रॅली नृसिंहवाडी, औरवाड, कवठेगुलदं मार्गे आलास, बुबनाळ, सात गावात गेली. यावेळी गावात फटाके वाजवून रॅलीचे स्वागत झाले. कुरुंदवाड येथील संपूर्ण गावात रॅलीचे तुफान स्वागत करण्यात आले. यावेळी शहरातील सर्व विभागातून रॅली मार्गस्थ होऊन सायकल रॅलीचा समारोप झाला. शिरोळ तालुक्यातील 54 गावात रॅली पोहचणार आहे. रॅलीत शहर प्रमुख राजू आवळे, अप्पासो भोसले, रामभाऊ माळी, अशोकराव सावगावे, राजू बेले, योगेश पटूकले, बाबासो सावगावे, कमरुद्दीन पटेल, दत्तात्रय कामत, मुस्ताक पटेल, लायकअबा पटेल, रहमतूला चौगुले, जयवंत मंगसुळे, आनंदा कुम्मे, नितीन निंबाळकर, राजू जंगम, संभाजी साळुंखे, दिनेश साळुंखे, उजवला पाटील, वैशाली जुगळे यांच्यासह शिवसेना कार्यकर्ते व महिला सहभागी झाले होते.

























































