राज्य उत्पादन शुल्क आणि पोलीसांचा दानोळीत छापा; तीन लाखाचा मुद्देमाल जप्त

304

शिरोळ तालुक्यातील दानोळी परिसरात राज्य उत्पादन शुल्क आणि पोलीस यांनी संयुक्तपणे अवैध गावठी दारु निर्मितीवर छापे घातले. छाप्यामध्ये 6 गुन्हे नोंद केले असून लोखंडी पिंप 11, प्लास्टिक पिंप 13, होज पाईप 8, सिंटेक्स टाक्या 5 प्लास्टिक पिशव्या 82, गावठी 920 लिटर व कच्चे रसायन 8950 लिटर असा एकूण 3 लाख 2 हजार 120 किंमतीचा मुद्देमाल जप्त करुन नाश करण्यात आला. शासकीय कामात अडथळा केल्याने एकावर जयसिंगपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

आपली प्रतिक्रिया द्या