
आष्टी, पाटोदा तालुक्यात अनेकांवर हल्ले करणाऱ्या बिबट्याने आता शिरुर कासार तालुक्यात प्रवेश केला आहे.आठ दिवसांपूर्वी तालुक्यातील जाटवड परिसरात एका महिलेवर बिबट्याने हल्ला चढवला होता. त्याच ठिकाणा पासून काही अंतरावर आता बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावण्यात आला आहे.
काल वन विभागाच्या वतीने मानूर परिसरात बिबट्याचा फिरत असल्याचे आढळल्याने त्या बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावण्यात आलेला. तालुक्यातील कोळवाडी, शिरुर खटकळी, राक्षसभुवन, येथील परिसरामध्ये बिबट्याचे ठसे आढळल्यानंतर खळबळ उडाली होती. मात्र पाहणी नतंर ते ठसे बिबट्याचे नसल्याचे स्पष्टीकरण वनविभागाच्या वतीने वनपरिक्षेत्र अधिकारी सायमा पठाण यांनी सांगितले. दोन तीन दिवसांपूर्वी शिरुर शहरातील सानप वस्ती,खटकळी पाण्याचा पाटा जवळील परिसर आणि कोळवाडी या गावात नागरिकांनी बिबट्या पाहिला असल्याचे नागरिकांनी सांगितले.
दरम्यान बिबट्या बद्दल खरी माहीती असेल तर लगेच वनविभागाला कळवा पण अफवा पसरवु नका असे वनपरिक्षेत्र अधिकारी सायमा पठाण यांनी सांगितले आहे. वनविभागाचे कर्मचारी दिवसरात्र बिबट्याला जेरबंद करण्यासाठी मेहनत घेत असून. लवकरच बिबट्या पकडण्यात येईल.नागरिकांनीही सहकार्य करावे.असे आवाहन करण्यात आले



























































