शीव उड्डाणपूल आज मध्यरात्रीपासून बंद

पूर्व आणि पश्चिम उपनगराला जोडणारा शीव रेल्वे मार्गावरील उड्डाणपूल बुधवारी मध्यरात्री 12 वाजल्यापासून वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार आहे. 112 बारा वर्षे जुना असलेला हा पूल 20 दिवसांनंतर पाडण्यास सुरुवात होईल. नाव्हेंबर 2024 पर्यंत हा पूल पाडून त्या जागी नवा पूल बांधण्यात येणार आहे. पुढील दोन वर्षांत हा पूल बांधून पूर्ण करण्याचे पालिकेचे उद्दिष्ट आहे. या पुलासाठी लागणारा 51 कोटींचा खर्च पालिका करणार असून रेल्वेकडून हा पूल बांधून घेण्यात येणार आहे. या मार्गावरून तब्बल 23 बेस्ट बस मार्ग प्रभावित होणार असून दादर आणि शीव परिसरातील वाहतूककाsंडीत भर पडणार आहे.