विद्याविहार रेल्वे स्थानकाबाहेर रिक्षा उभी करून दिवसाढवळ्या ये-जा करणाऱ्या महिलांना अश्लील हावभाव करून दाखविणाऱ्या आंबटशौकीन चालकाची शिवसैनिकांनी चांगलीच उतरवली. एका महिलेने हा किळसवाणा प्रकार सांगताच संतप्त शिवसैनिकांनी त्या रिक्षाचालकाला चोप देऊन त्याला टिळक नगर पोलिसांच्या ताब्यात दिले.
आरोपी महिलेला रिक्षा उभी करून चीड येईल असे अश्लील कृत्य करून दाखवत होता. त्या महिलेने इस्पितळ गाठल्यावर शिवसेनेचे प्रकाश वाणी यांना सांगितले. वाणी यांनी लगेच प्रसाद कामतेकर, विलास लिगाडे, महादेव राक्षे, सचिन भांगे, अजिंक्य वाणी, सागर सोनावणे, चंद्रकांत हळदणकर, अशपाक अन्सारी व अन्य नागरिकांनी लगेच विद्याविहार रेल्वे स्थानक गाठून महिलांना अश्लील हावभाव करून दाखविणाऱ्या शाहनवाज अन्सारी (26) याला पकडून चोप दिला. मग त्याला टिळक नगर पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल करून शाहनवाज याला अटक केली आहे.